संजय राऊत धमकी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, दारुच्या नशेत…

84

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर बिश्नोई गँगकडून धमकीचे संदेश आले. या संदेशामध्ये दिल्लीत आल्यावर AK 47 ने हत्या करण्याची धमकी दिली होती. सध्या या संदेशाचे स्क्रिनशॉट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. याप्रकरणी आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस नक्की काय म्हणाले?

प्रसार माध्यमांसोबत बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांच्या धमकी प्रकरणातील माणसाची ओळख पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दारुच्या नशेत त्यांनी अशाप्रकारची धमकी दिली आहे. याप्रकरणात संपूर्ण तपास केला जाईल. आणि कोणीही धमकी दिली असेल, तर कारवाई होईल. तसेच महाराष्ट्रात कोणीही कोणाला धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत. यासंबंधीत व्यक्तीवर कारवाई होईल.

दरम्यान विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला आलेल्या धमक्यांची चेष्ठा करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, यात चेष्ठा करण्याचे कोणतेही कारण नाही.

(हेही वाचा – संजय राऊत धमकी प्रकरणात पुण्यातून एकजण ताब्यात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.