लंडनमधील भारत भवन (इंडिया हाऊस) येथे तिरंगा घेऊन आलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी खलिस्तानींना जोरदार चपराक मारली आहे. रविवारी, खलिस्तानींनी तेथे गोंधळ घातला होता, भारताचा तिरंगा उतरवून खलिस्तानी झेंडा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ज्याला उत्तर देताना भारतीय संघटनांनी देशाच्या स्वाभिमानासाठी त्यांचे समर्पण दाखवले आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहत एका आवाजात ‘आम्ही हिंदुस्थानी आहोत’ असे म्हटले.
Today Indian Diaspora and British Indians gathered at @HCI_London to show solidarity with our Indian High commission against #Khalistanis
Indians=Celebrations.
Even @metoffice joined these celebrations. 🙂👌🏼👏🏼👏🏼 pic.twitter.com/RbSRSqU0dj
— Tathvam-asi (@ssaratht) March 21, 2023
पंजाबमधील खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरक्षा यंत्रण कार्यरत झाल्याबरोबर परदेशात बसलेल्या खलिस्तानींनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. लंडनमधील भारत भवनावर रविवारी खलिस्तानवाद्यांनी अचानक हल्ला केला. तेथे लावलेला तिरंगा ध्वज हटवण्याचा प्रयत्न केला पण भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याने तो यशस्वी होऊ दिला नाही. दुसऱ्या दिवशी भारतीय उच्चायुक्तालयावर भव्य आकाराचा तिरंगा फडकवण्यात आला.
(हेही वाचा स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर विचारांचा मार्गदर्शक आधारस्तंभ ढासळला )
भारतीयांच्या संघटना एकत्र आल्या
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या खलिस्तानी हल्ल्याचा सर्व स्तरातून विरोध करण्यात आला. तेथील सरकारने त्याला कडाडून विरोध केला आहे. यानंतर तेथे स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मंगळवारी जोरदार निदर्शने केली. ज्यात तिरंगा घेऊन आलेले भारतीय वंशाचे लोक एका आवाजात म्हणाले, आम्ही भारतीय आहोत. या व्हिडिओमध्ये भारतीय कपडे परिधान केलेले लोक झेंडा फडकावत आहेत. काही व्हिडिओंमध्ये पोलिस कर्मचारीही भारतीयांसोबत नाचताना दिसत होते. हा सगळा प्रकार म्हणजे खलिस्तानींच्या तोंडावर मोठी चपराक आहे.
Join Our WhatsApp Community