कुणाचे हॉटेल सिंगापूर, लंडन, अमेरिकेत आहे, सगळे एक दिवस महाराष्ट्रासमोर आणणार; रामदास कदमांचा इशारा

120

खोके खोके काय करता? कुणाचे हॉटेल श्रीलंकेला आहेत? कुणाचे हॉटेल सिंगापूरला आहेत? कुणाचे हॉटेल लंडनला आहेत? अमेरिकेत कुणाच्या मालमत्ता आहेत? हे एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय रामदास कदम स्वस्थ बसणार नाही. खोक्याची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? असा सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. ज्या रामदास कदमने मराठवाड्यात खोके वाटून तुमची उंची वाढवली आणि आम्हाला म्हणता आम्ही विकलो गेलो, हा रामदास कदम स्वतःला डाग लावून घेणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.

योगेश कदम याला कसे संपवायचे? यासाठी ठाकरे गटाकडून षडयंत्र रचले जात होते. उदय सामंतही तेव्हा त्या गटात होते. कटात नव्हते. तो बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढे होता. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाईसारख्या शेळ्या-मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे, अशी जोरदार टीका रामदास कदम यांनी केली.

(हेही वाचा उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांविरोधात कट रचत होते; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात)

मला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कट रचलेला 

२००९ मध्ये मला गुहागरमध्ये तिकीट दिले, तिथे मला आपल्याच नेत्याला सांगून पाडले, कशासाठी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून. विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री बनतो, म्हणून मला पाडले. हा जाधव काय मला पाडणार? असे ५६ जाधव मी खिशात घालून फिरतो. दापोलीतूनही माझा मुलगा योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न केला, आम्ही काय घोडे मारले तुमचे? नारायण राणे बाहेर पडल्यावर गाडीत मला पुढे बसवल्याशिवाय तुम्ही फिरत नव्हता, त्याची परतफेड केली का? मला संभाजी नगर, नांदेडचा पालकमंत्री केला पण रामदास कदमला कोकणात पाठवायचे नाही, त्याऐवजी रवींद्र वायकरला दिले. योगेश कदमला पाडण्यासाठी गट कार्यरत ठेवला होता. २० आमदार तुम्हाला दोन्ही काँग्रेसचा नाद सोडा म्हणून सांगायला गेले, त्यांना गेट आऊट केले, त्यांच्यावर तुम्ही खोके खोके म्हणून आरोप करता. बाळासाहेबांचा मुलगा खोटे बोलतो. १९९० साली माझ्यासमोर दाऊदचा माणूस होता त्याला मी घाबरलो नाही, त्या जाधवला मी घाबरतो काय? मला डावलून भास्कर जाधवला जवळ केले. आज काही बोलत नाही. आमच्याकडे खूप गोष्टी आहेत, असे रामदास कदम म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.