रामनवमीच्या दिवशी उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण चोरला असला, तरी…’

97

एका दृष्टीने पाहिले, तर असे कुणीतरी कुणासाठीतरी इतके किलोमीटर पायपीट करत येणे आताच्या काळात अवघड नाही, अशक्य आहे. तुम्हाला मातोश्रीत यावे आणि माझ्यासोबत उभे राहावे असे वाटणे हा मी रामाचा आशीर्वाद मानतो. रामटेकमधून निघून तुम्ही बरोबर राम नवमीला इथे पोहोचलात. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. रामनवमीच्या निमित्ताने एकही शिवसैनिक रामटेकहून मुंबईपर्यंत पायी चालत मातोश्री येथे आले, त्याचे कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले.

लोकशाही वाचवणे हे केवळ माझ्या एकट्याचे काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. रामसेतू बांधताना वानरसेना तर होतीच, पण खारही होती. तेव्हा तर खारीनेही तिचा वाटा उचलला. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला. ज्या हिंमतीने रामटेक ते इथपर्यंत पायी येणे ही हिंमत आहे. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला, तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहेत. हे सगळे ब्रह्मास्र माझ्याबरोबर आहेत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

(हेही वाचा जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.