एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात पाच दिवस सुट्या येत असल्याने राष्ट्रीयकृत बॅंकांना सुट्या असतील. त्यामुळे मार्चअखेरीनंतर पहिल्याच आठवड्यात अनेकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. तुमचीही बॅंकांमधील महत्त्वाची कामे बाकी असतील, तर येत्या आठवड्यात पूर्ण करून घ्या.
( हेही वाचा : कोकणात जाताय? परशुराम घाट ३ एप्रिलपर्यंत दररोज ६ तास राहणार बंद!)
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाच दिवस सुट्ट्या
- यंदाचे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ ला रोजी संपणार आहे. यादिवशी शुक्रवार आहे, त्यानंतर एप्रिल महिना उजाडेल.
- दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी शनिवार असल्यामुळे बहुतांशी बॅंका सुट्टी आहे.
- दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टीनिमित्त सर्व बॅंका बंद राहणार आहेत. ३ एप्रिल २०२३ अर्थात सोमवारी बॅंका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
- ४ एप्रिलला महावीर जयंतीनिमित्ताने बॅंकांना सुट्टी असणार आहे. ५ आणि ६ एप्रिल २०२३ ला बॅंका सुरू राहतील.
- ७ एप्रिलला गुडफ्रायडेनिमित्त बॅंका बंद असतील.
- ८ एप्रिलला शनिवार असल्याने देशातील बहुतांश बॅंका बंद असणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फक्त तीन दिवस बॅंकांचे कामकाज सुरु राहणार आहे.
- दुसऱ्या आठवड्यातही १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यामुळे एक दिवस सुट्टीचा असेल.
- २२ एप्रिल रोजी रमजान ईद व अक्षय्यतृतीयानिमित्त बॅंकांना सुट्टी असणार आहे. चौथ्या आठवड्यात मात्र आठही दिवस बॅंका सुरु राहणार असल्याने ग्राहकांची सोय होणार आहे.