छत्रपती संभाजीनगरमधील राड्यात एकाचा मृत्यू; ६ जणांना अटक

132

छत्रपती संभाजीनगरमधील झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, ५१ वर्षीय पुरुषाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान आतापर्यंत याप्रकरणी ६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या राड्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. सध्या शहरात शांतता असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन देखील पोलीस आयुक्तांनी केले आहेत.

नक्की काय घडले होते? 

रामनवमीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किराडपुऱ्यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. बुधवारी रात्री साडे अकरा, बारा वाजण्याच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होतो. त्याच दरम्यान त्यांचा दुसऱ्या गटाशी वाद सुरू झाला. सुरुवातीला शिवीगाळ, हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील तरुणांनी आपापल्या इतर साथीदारांना बोलावले आणि या वाद आणखी चिघळला. याबाबत पोलिसांना माहित मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटांना आवरण्याचा प्रयत्न केला गेला.

पण जमावाने यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. यामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान यावेळी जमावाने फक्त दगडफेकच नाही, तर पोलिसांच्या काही गाड्या देखील जाळल्या. शेवटी पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही काही जमाव शांत झाला नाही, त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हा हिंसाचार सुरू होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

(हेही वाचा- मालवणी राडा प्रकरणी २० जणांना अटक; नक्की काय घडले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.