मुंबईतील वाहतुकीत पाच महिन्यांसाठी मोठे बदल! पर्यायी मार्ग पाहून करा प्रवासाचे नियोजन

76

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प कोस्टल रोड सध्या अंतिम टप्प्यात आहे. मरीन ड्राइव्हजवळील एनएस मार्गावर या रोडचे काम सुरू आहे. कोस्टल रोडच्या कामामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या मार्गांवर बदल करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून मुंबईकरांनी यादरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहनही मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

( हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निर्णय नाहीच; ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी)

कोस्टल रोड बांधकामामुळे, मरीन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील कॅरेजवेवर (तारापोरवाला मत्स्यालय आणि इस्लाम जिमखाना दरम्यान) एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचे काम पुढील ५ महिन्यांसाठी केले जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांचे आवाहन 

एनएस मार्गावरून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याजवळील सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस नागरिकांनी प्रवासासाठी एनएस मार्गाचा वापर करू नये अशी सूचना मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

https://twitter.com/MTPHereToHelp/status/1637485311079989248

दक्षिण मुंबईतून प्रवास करणाऱ्यांनी महर्षी कर्वे रोड, केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गाचा वापर करावा असेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.