छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगासमोर यावे यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्ली येथे केली.
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ करावे अशी मागणी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. pic.twitter.com/dp8K8yB0cx
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 30, 2023
खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा अशीही मागणी केली. त्याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले.
(हेही वाचा जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक )
Join Our WhatsApp Community