स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर कुटुंबासह समस्त राष्ट्रभक्तांची अपरिमित हानी

181

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी विक्रमराव सावरकर यांचे मंगळवार, २१ मार्च रोजी पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८४ वर्षांच्या होत्या. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ देणाऱ्या स्वामिनी सावरकर या अखेरपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर पुण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे केवळ सावरकर कुटुंबियांचीच नव्हे तर सर्व राष्ट्रभक्तांची अपरिमित हानी झाली आहे, अशी भावना समस्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्यक्त करत आहेत.

 

(हेही वाचा स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर विचारांचा मार्गदर्शक आधारस्तंभ ढासळला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.