गुणरत्न सदावर्तेंना उच्च न्यायालयाने फटकारत दिलासा देण्यास दिला नकार

129

काही दिवसांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाने मोठा झटका दिला होता. सार्वजनिक ठिकाणी वकिली गणवेश, बँड घालून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द करण्याचा निकाला देण्यात आला होता. त्यानंतर या निकालाविरोधात सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने सदावर्तेंना दिलासा देण्यास नकार देत त्यांना चांगलेच फटकारले.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाच्या निकालाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली आणि यावेळी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्तेंना धक्का बसला. उच्च न्यायालयाने सदावर्तेंना दिलासा देण्यास नकार दिला. आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे आदेश देण्यात आले. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सदावर्तेंना चांगलेच फटकारले.

सुनावणीच्या वेळी गुणरत्न सदावर्तेंनी माध्यम माझी बदनामी करत असल्याचा आरोप उच्च न्यायालयात केला. यावेळी बोलताना सदावर्तेंची भाषा आक्रमक होती. त्यामुळे दोन वेळा न्यायालयाने त्यांना समजावले. पण तरी देखील सदावर्तेंचा आवाज काही कमी झाला नाही, तो वाढतच राहिला. शेवटी न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारत म्हटले की, ‘मोठ्याने बोलू नका. तुम्ही माध्यमांसमोर बोलत नाहीत. न्यायालयात दाद मागण्यासाठी आला आहात, याचे भान राखा.’

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चात घोषणा देणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.